6 February 2025 Rashi Bhavishya In Marathi : ६ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी रात्री १० वाजून ५४ मिनिटांपर्यंत राहील. ब्रह्म योग संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. कृतिका नक्षत्र आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत जागृत असेल. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी सूर्य धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. तर या दिवशी ग्रहमान व पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

६ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल.

वृषभ:- ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल.

मिथुन:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल. कामाची चोख पावती मिळेल.

कर्क:- दिवस चांगल्या संगतीत जाईल. वडीलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल.

सिंह:- खेळात मन रमून जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल.

कन्या:- पत्नीची उत्तम साथ लाभेल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल.

तूळ:- भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल.

वृश्चिक:- काही किरकोळ कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.

धनू:- दिवस धावपळीचा राहील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

मकर:- मनातील निराशा दूर सारावी. कुटुंबात काही बदल घडून येतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ:- कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल.

मीन:- हौस पूर्ण कराल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. सर्वांशी गोडीने वागाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya dhanishta nakshtra parivartan on 6 february 2025 these rashi will earn success in job and huge money read your horoscope in marathi asp