आज १५ जून रोजी सूर्याचे संक्रमण होत आहे. सूर्य वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करत आहे. पुढील एक महिना सूर्य मिथुन राशीत राहील. या काळात हे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल. यापैकी वृषभ, सिंह, मकर आणि कुंभ या चार राशींसाठी हे सूर्य संक्रमण अत्यंत शुभ राहील. त्याच वेळी, सूर्याचा हा संक्रमण कालावधी पाच राशीच्या लोकांसाठी शुभ म्हणता येणार नाही. जाणून घ्या पुढील एक महिन्यासाठी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- मेष :
मेष राशीच्या लोकांनी एक महिना स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: कुटुंबातील वृद्ध सदस्य आणि पालकांची काळजी घ्या. कठोर आणि कडू बोलणे टाळा.
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
- कर्क :
कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. आपल्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणे आणि सकस आहार घेणे चांगले.
- वृश्चिक :
मिथुन राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यवहार काळजीपूर्वक करणे चांगले. फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी इकडे बोलणे तिकडे करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.
राहूचे नक्षत्र परिवर्तन चमकावणार ‘या’ राशींचे नशीब; होणार धन-संपत्तीचा वर्षाव
- धनु :
सूर्य संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतो. वादविवाद टाळा. व्यापाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आरोग्याचीही काळजी घ्या.
- मीन :
सूर्य मिथुन राशीत असल्याने मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे. तुमचे बोलणे योग्य ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. नोकरीत सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. आपल्या आरोग्याची आणि आपल्या पालकांची काळजी घ्या. मालमत्तेचा वादही होऊ शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)