Surya Gochar 2023: ग्रहांचा राजा सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. अशातच आता १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी सूर्य स्वतःची सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कन्या राशीत प्रवेशाचा १२ राशींच्या जीवनावर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष रास

या राशीच्या सहाव्या स्थानी सूर्य गोचर करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते. तसेच दीर्घकाळ चालणारा आजारही बरा होऊ शकतो. याशिवाय बाराव्या स्थानी सूर्य असल्यामुळे अनावश्यक खर्चाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.

वृषभ रास

या राशीत सूर्य पाचव्या स्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांसाठी खूप दिवसांपासून तयारी करत असणाऱ्यांना यश मिळू शकते. या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या चौथ्या स्थानी सूर्य गोचर करणार असून या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर अशुभ ठरु शकते. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आईशी काही कारणावरून वाद होऊ शकतात, त्यामुळे रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

हेही वाचा- १० सप्टेंबरला दुर्मिळ ‘रविपुष्य योग’ बनताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

कर्क रास

या राशीमध्ये सूर्य तृतीय स्थानी गोचर करत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना काही लाभ होऊ शकतात. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.

सिंह रास

कन्या राशीच्या गोचर दरम्यान सूर्य तुमच्या दुसऱ्या स्थानी प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज भासू शकते. मालमत्तेशी संबंधित समस्यांमुळे काही त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.

कन्या रास

या राशीमध्ये सूर्य कन्या राशीच्या लग्न स्थानी प्रवेश करत आहे. त्यामुळे या राशीचे लोक आत्मविश्वासाने राहू शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. व्यावसायिक जीवनात तुम्हाला खूप चांगले फायदे मिळू शकतात.

तुळ रास

तुळ राशीमध्ये सूर्याचे बाराव्या स्थानी गोचर करत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिक स्थितीबाबत थोडे सावध राहण्याची गरज असून आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच कोणताही निर्णय घेऊ शकता.

वृश्चिक रास

या राशीमध्ये सूर्याचे अकराव्या स्थानी गोचर होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु रास

या राशीच्या दहाव्या स्थानी प्रवेश सुर्य प्रवेश करणार आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांना सरकारी नोकरी आणि व्यावसायिक जीवनात लाभ मिळू शकतो तसेच तुमचे नशीब पूर्ण साथ देऊ शकते. काही भाग्यवान बदल घडू शकतात. आयुष्यात अनेक नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन उर्जेने काम कराल, त्यामुळे प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर रास

सूर्याचे गोचर मकर राशीसाठी संमिश्र परिणाम देऊ शकते. या काळात तुमची अध्यात्माकडे वाटचाल होऊ शकते. वडिलांच्या प्रकृतीबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. संवादात आत्मविश्वास वाढू शकतो.

कुंभ रास

सूर्य कुंभ राशीच्या आठव्या स्थानी प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात तुम्हाला काही शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा- १६ सप्टेंबरपासून ‘या’ चार राशींच्या लोकांचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल? बुध ग्रह देईल शुभयोग

मीन रास

मीन राशीतील सूर्य कन्या राशीत गोचर करत आहे. जे मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकत नाही. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांशी विनाकारण वाद घालणे आणिकर्ज देणे टाळू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)