ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यदेवाच्या कृपेने माणूस नेहमी निरोगी राहतो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते, असे मानले जाते. १७ ऑगस्ट रोजी सूर्य नारायण आपल्या घरी म्हणजेच सिंह राशीत पोहोचले आहेत. येथे सूर्यदेव महिनाभर म्हणजेच १७ सप्टेंबरपर्यंत राहणार आहेत. राजकुमार बुध आधीच तेथे आहे. सुर्यदेव आता स्वराशीत आल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तर काहींना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणत्या राशीला होणार फायदा तर कोणत्या राशींना सतर्क राहावे लागणार?

कर्क राशी

सूर्यदेवाचे संक्रमण झाल्याने कर्क राशीतील लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या राशीतील लोकांना या काळात नोकरी किंवा व्यवसायात संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. १७ सप्टेंबरपर्यंत या राशीतील लोकांना संयमाने कामावर लक्ष केंद्रित करावे लागू शकते. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. २० ऑगस्टनंतर परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : नोव्हेंबरपासून वृषभसह ‘या’ राशींवर शनिदेव करणार कृपा? ‘शश राजयोगा’मुळे होऊ शकतात कोट्याधीश )

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी काळ खूप चांगला जाणार आहे, कारण त्यांचा स्वामी आपल्या घरी परतला आहे. या काळात या राशीतील लोकांना प्रचंड आर्थिक फायदा होऊ शकतो. चोहू बाजूने पैसे मिळू शकतात. आर्थिक लाभासोबत करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. तुमची अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. घरात आणि कार्य क्षेत्रात मान सन्मान वाढू शकतो. प्रत्येक कामातून तुमच्यासाठी धनलाभाचा योग आहे. 

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना सूर्यदेव सिंह राशीत असताना अत्यंत सावधगिरीने काम करावे लागू शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्यामुळे पूर्ण मेहनत घेऊन तुमच्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागू शकते. या काळात तुम्हाला किरकोळ समस्या उद्भवू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 