Surya Gochar in Dhanu 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा मानला जाणारा सूर्यदेव दर महिन्याला राशी बदलतो. डिसेंबरमध्ये, सूर्यदेवाने १६ डिसेंबर २०२३ रोजी धनु राशीत प्रवेश केला असून महिनाभर तो या राशीत राहील. सूर्याच्या धनुसंक्रांतीने खरमास सुरू होते. या एक महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. धनु राशीतील सूर्याचे संक्रमण सर्व बारा राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव टाकू शकते. पण काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर सूर्यदेवाच्या संक्रमणाचा शुभ परिणाम पडू शकतो. या राशींचे भाग्य चमकू शकते. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
सूर्याचे राशीपरिवर्तन ‘या’ राशींना करेल मालामाल?
मेष राशी
सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. कामात पूर्णपणे यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा व्यवसाय आणखी वाढू शकतो. घर आणि कार घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद मिळण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : वृश्चिक राशीसाठी २०२४ वर्ष कसे असणार? त्रिग्रही योग अन् शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत? आरोग्य व प्रेम साथ देणार का? )
सिंह राशी
सूर्याचे राशीपरिवर्तन झाल्याने सिंह राशीतील लोकांच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. करिअरचा विकास योग्य दिशेने होऊ शकतो. आरोग्य सुधारुन, जीवनात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. नोकरी-व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
धनु राशी
सूर्य देवाचे राशीपरिवर्तन या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. सूर्य देवाने धनु राशीत गोचर केल्याने या राशींच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, ज्यामुळे कर्ज मुक्त होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)