Surya Rashi Parivartan 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. ज्याचा जीवनावर परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला आत्म्याचे मर्म मानले जाते. सूर्यदेव दर महिन्याला एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सूर्याचा हा राशी बदल ही ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. सूर्याला ग्रहांचा राजा असंही म्हटलं जातं. आता १५ जानेवारीला सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. २ वाजून ३२ मिनिटांनी शनिदेवाच्या लाडक्या मकर राशीत सूर्यदेव प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात सुख समृध्दी आणि अपार यश लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
‘या’ राशींना होणार धनलाभ?
वृश्चिक राशी (Scorpio)
सूर्यदेव राशी परिवर्तन करुन या राशीच्या तिसऱ्या भावात असणार आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. या लोकांना अचानक खूप पैसा मिळू शकतो. यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा: Vastu Tips Calendar: घरात ‘या’ दिशेला कॅलेंडर लावल्याने नांदते सुख-समृद्धी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा)
धनु राशी (Sagittarius)
या राशीत सूर्यदेव दुसऱ्या भावात विराजमान राहणार आहेत. यामुळे धनु राशीच्या लोकांना नशीबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. अडकलेली कामं पूर्ण झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. या काळात पैसा, मान, पद, सर्व काही मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे फायदेही होऊ शकतात. नवीन काम सुरू करू शकता. घरातील वातावरण आनंददायी राहण्याची शक्यता आहे.
मीन राशी (Pisces)
सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करुन मीन राशीच्या अकराव्या भावात राहणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात केलेल्या मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळू शकतो. या काळात नोकरीत बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. वैवाहिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)