Navpancham Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या राशीमध्ये होणारा बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करतो. याचसह एखाद्या ग्रहाशी युती किंवा असा संबंध तयार झाला की, शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी ग्रहांचा राजा सूर्याने आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच होतो. गुरु देखील वृषभ राशीमध्ये अस्त अवस्थेत आहे. याच केतू ग्रह कन्या राशीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि केतू यांच्यामध्ये नवपंचम योग तयार झाला आहे. हा योग सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. काही राशीच्या लोकांना हा योग तयार झाल्याने फायदा होईल, तर इतर राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील. चला जाणून घेऊया नवपंचम योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना प्रचंड फायदा होईल…

कर्क

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. याचसह तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. याचबरोबर तुम्ही मित्रांसह सहलीला जाऊ शकता. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. परस्पर समंजसपणामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही खूप फायदा होणार आहे. तुमच्या कामाकडे पाहता, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल किंवा पगारात वाढ होईल.

shash and malavya rajyog will make after holi these zodiac sign could be lucky
शश आणि मालव्य राजयोगामुळे या ३ राशींचा सुरू होईल सुर्वणकाळ; शनी-शुक्र देवाच्या कृपेने होळीच्या आधी पूर्ण होतील सर्व कामे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Venus Planet Gochar In Meen
१२४ दिवसांनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह परम उच्च स्थानी! ‘या’ ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपार वाढ, पद-प्रतिष्ठा वाढणार
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Hanuman Favourite people
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर नेहमी असते हनुमानाची विशेष कृपा, कायम मिळतो पैसाच पैसा!
Shatgrahi Yog 2025 six planets auspicious yog in pisces
Shatgrahi Yog 2025 : २९ मार्चनंतर ‘या’ राशींचे खुलणार नशीब, मीन राशीतील शतग्रही योगाने मिळणार अमाप पैसा अन् कामात यश

हेही वाचा – वाईट काळ संपणार! १ जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ४ राशींचे नशीब? सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती 

सिंह

नवपंचम योग सिंह राशीच्या लोकांसाठी देखील खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. याचसह व्यावसायिक जीवनातही बरेच फायदे होतील. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये ताकद आणि स्थिरता येईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आईच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. यासोबतच नोकरी करणारे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. आता त्यात यश मिळू शकते. याच तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. व्यवसायातही वाढ आणि विस्तार दिसून येईल.

हेही वाचा – डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत तो आपल्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतरही करू शकतो. जीवनात अनेक प्रकारचे आनंद दार ठोठावू शकतात. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद आता संपुष्टात येईल. याचबरोबर मित्रांसह तुमचा वेळ चांगला जाईल. नोकरदारांनाही हा योग आनंद देणारा आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांची त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. याचसह जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. पण यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Story img Loader