Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, सूर्याने १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

सूर्य करणार मालामाल

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: २१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या

धनु

सूर्याचा मकर राशीतील प्रवेश धनु राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखदायी असेल. हा काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar 25 after four days surya enter in makar rashi 25 sap