Surya Gochar 2025 News In Marathi : एप्रिल २०२५ ज्योतिषशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात सूर्य, शनि, मंगळ आणि बुध सारखे प्रमुख ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ज्यामुळे सर्व १२ राशींचा त्यावर प्रभाव दिसून येईल. विशेष म्हणजे ग्रहांचा राजा सूर्य सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे ज्यामुळे सर्व राशींच्या जीवनावर मोठा बदल दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव १४ एप्रिल रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवाला ग्रहाचा राजा आणि सिंह राशीचा स्वामी मानले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, जी व्यक्ती खूप श्रद्धेने सूर्याची आराधना किंवा पूजा करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. १४ एप्रिल रोजी सूर्य देव हा मेष राशीमध्ये गोचर करून खरमास समाप्ती होणार पण त्याबरोबर अन्य मांगलिक कार्यांची सुरुवात होणार. सूर्याचा हा गोचर अनेक राशींसाठी शुभ वार्ता घेऊन येईल. जाणून घेऊ या त्या चार राशी कोणत्या आहेत.

मेष राशी

सूर्याचा सरळ प्रवेश मेष राशीमध्ये निर्माण होणार, जो या लोकांना नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास देणार. जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा दिसून येईल. या दरम्यान सूर्य देवाच्या कृपेने कार्यांमध्ये यश मिळेल. व्यवसायात या दरम्यान जबरदस्त नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. सूर्य देवाच्या कृपेने नवीन नोकरीची संधी मिळू शकते.

मिथुन राशी

सूर्याच्या या चालीमुळे मिथुन राशीच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याला वेग मिळेल. या दरम्यान सूर्य देवाच्या कृपेने या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग जुळून येईल. या दरम्यान नोकरी करणाऱ्या लोकांचा पगारवाढ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. याशिवाय या दरम्यान अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसायात या दरम्यान अतिरिक्त नफा मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहीन. मानसिक आरोग्य उत्तम राहीन.

कर्क राशी

सूर्याचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. सूर्य गोचर मुळे या राशीच्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळणार. धार्मिक किंवा मांगलिक कार्यांमध्ये सहभागी होतील. विदेश यात्रांचे योग जुळून येतील. अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकतात. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. धन आणि ऐश्वर्यामध्ये वृद्धी होईल. आईवडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आकस्मिक धन लाभ होऊ शकतो.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी हा गोचर संपत्ती आणि मानसिक स्थिरतेशी संबंधित आनंद देणारा असू शकतो. सूर्याचा हा गोचर एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवू शकतो. याशिवाय या दरम्यान जमीन, वाहन आणि दागिन्यांची खरेदी करण्याचे योग जुळून येईल. पितृ संपत्तीचा वाद मिटेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दरम्यान पगारात जबरदस्त वाढ होऊ शकते. धन कमावण्याची अनेकदा संधी प्राप्त होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)