Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते. सूर्याच्या गोचरचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. आज १४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:३० वाजता सूर्यदेवाने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. मेष ही मंगळाचे स्वामित्व असलेली रास आहे. अशा परिस्थितीत १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला आहे. पण काही राशी अशा आहेत, ज्यांना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहू या भाग्यशाली राशी कोणत्या…
सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशी होऊ शकतात मालामाल?
मेष
सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात. तुम्हाला विवाहाचे योग आहेत. प्रेमाच्या माणसाची साथ लाभल्याने दिवस आनंदात जाऊ शकतात. विवाहित मंडळींना संततीसुख अनुभवता येऊ शकते. आर्थिक बाजू भरभक्कम झाल्याने तुमच्या मनावरील ताण- तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते. या काळात तुम्हाला आयुष्याला कलाटणी देणारे काही निर्णय घ्यावे लागू शकतात. तुमचे आई-वडील तुमच्या कामावर खूश होऊ शकतात. अविवाहित लोक त्यांच्या जीवनसाथीच्या शोधात असतील, तर त्यांना यश मिळू शकते. कौटुंबिक सुखाने तुमचे दिवस समृद्ध होऊ शकतील.
कर्क
सूर्यदेवाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. उद्योगधंद्यात वा नोकरीत आपण आखलेल्या योजनांची पूर्तता होण्याचे प्रसंग अनुभवू शकाल. राजकारणात, सामाजिक कार्यात आपल्या मुत्सद्दीपणाचे कौतुक होऊ शकते. अपूर्ण कामे पूर्ण होऊन, त्यातून धनलाभ होऊ शकतो. दुसरीकडे व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांमुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, नोकरदार लोकांसाठी हा काळ भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो.
मकर
सूर्यदेवाच्या कृपेने मकर राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. बँक बॅलन्स व संपत्तीत वाढ होऊ शकते. विवाहेच्छुक व्यक्तींना उत्तम स्थळ सांगून येऊ शकते. लग्न योग आहे. उद्योगधंद्यात वा नोकरीत नवीन नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. राजकारण, सामाजिक कार्यात आपले वर्चस्व कायम राखू शकाल. दूरच्या प्रवासाचे योग घडून येऊ शकतात. त्यातील ओळखी वा परिचयातून लाभ संभवू शकतात. प्रेमाची नाती सुधारू शकतात. आर्थिक स्थितीही चांगली राहून तुम्ही या काळात पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)