Surya Gochar 2025: ग्रहांचे राजा सूर्य आत्मा, वडिलांचा कारक मानले जाते जे एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात आणि ज्याचा थेट परिणाम १२ राशींच्या जीवनावर दिसून येतो. या वेळी सूर्य मीन राशीमध्ये विराजमान राहणार आहे पण एप्रिल महिन्यात १४ तारखेला तो राशी राशी परिवर्तन करणार आहे आणि मेष राशीमध्ये प्रवेश करणार. मेष राशीमध्ये पूर्ण एक महिना राहणार आहे.
सूर्याने मेष राशीमध्ये आल्याने १२ राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रभाव दिसून येईल. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांच्यावर सर्वात जास्त चांगला प्रभाव दिसून येईल. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
वैदिक पंचाग नुसार, सूर्य १४ एप्रिल रोजी सकाळी तीन वाजून ३० मिनिटांनी मीन राशीमधून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि १४ मे पर्यंत एकाच राशीमध्ये विराजमान राहणार आहे. या राशीत एक महिना राहिल्यानंतर जवळपास १२ महिने सूर्य उच्च राशीमध्ये प्रवेश करणार.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे मेष राशीमध्ये जाणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या अकराव्या स्थानात सूर्य राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तसेच कामामुळे विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
कुटुंबबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तसेच व्यवसायात खूप लाभ मिळू शकतो. जीवनात आनंद मिळू शकतो. पार्टनरशिपमध्ये सुरु असलेल्या व्यवसायात भरपूर लाभ मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहीन. तसेच या लोकांना चांगली वार्ता मिळू शकते.
कर्क राशी (Kark Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे मेष राशीमध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. या राशीचे दुसऱ्या भावातील स्वामी होऊन कर्म भावात म्हणजेच दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना खूप चांगले परिणाम मिळू शकतात. जीवनात खूप शांती दिसून येईल. तसेच कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. सूर्याच्या कृपेने पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.
याबरोबर या लोकांना पदोन्नती मिळण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यवसायात अधिक लाभ मिळू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. दांपत्य जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते. त्यामुळे घरामध्ये आनंद आणि समृद्धी नांदेल.
कुंभ राशी(Kumbha Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य मेष राशीमध्ये लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये सूर्य तिसऱ्या भावात राहणार आहे. तसेच या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरी तसेच व्यवसायात खूप लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. तसेच या लोकांना खास नफा मिळू शकतो. जीवनात समृद्धी नांदेल.
सरकारी कामात अपार यश मिळू शकते. हे लोक त्यांचे वेगळे वर्चस्व बनवण्यात यशस्वी होऊ शकतात. जीवनात काही सकारात्मक घटना घडतील ज्यामुळे चांगले फळ प्राप्त होतील.