Surya Gochar 2025 : नवीन वर्ष २०२५ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या नव्या वर्षातही अनेक लहान-मोठे ग्रह राशिबदल करणार आहेत. त्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य देवही राशिबदल करणार आहे. २०२५ च्या सुरुवातीला सूर्य देव मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्य देवाची विशेष कृपा असणार आहे. या राशींना सूर्य देवाच्या कृपेने अचानक धनलाभ अन् मान-प्रतिष्ठा मिळू शकते. कोणत्या राशींना यामुळे फायदा मिळू शकतो ते जाणून घेऊ…
सिंह (Leo)
सूर्य देवाचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या काळात तुमचे नशीब चमकू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल आणि तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढू शकते. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ मिळेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच तुम्हाला देश-विदेशांत फिरण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊ शकते. तुम्ही हाती घेतलेल्या कामांत तु्म्हाला यश मिळेल.
मेष (Aries)
सूर्य देवाचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाह किंवा मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते.
धनू (Sagittarius)
सूर्य देवाचा राशिबदल धनू राशीसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. याव्यतिरिक्त कामातून उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नातेसंबंध अधिक दृढ होतील. लव्ह लाईफमध्ये उत्साह वाढेल. यावेळी विद्यार्थी उच्च संस्थेत अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या काळात ध्यान योग आणि आध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये रुची वाढेल. त्यामुळे मानसिक शांतता आणि आंतरिक संतुलन साधेल.