Surya Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. काही ग्रहांचा मूळ वेग कमी असल्याने त्यांच्या ग्रह गोचराला सुद्धा वेळ लागतो. आता तब्बल ३६५ दिवसांनी ग्रहांचा राजा सूर्य हा वृषभ राशीत प्रवेश घेणार आहे. या गोचरचा अत्यंत शुभ प्रभाव काही राशींच्या कुंडलीत दिसून येणार आहे. सध्या सूर्यदेव हे मेष राशीत विराजमान आहेत तर आता येत्या १५ मे २०२३ ला सूर्यदेव हे वृषभ राशीत गोचर करणार आहेत. सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांनी हे सूर्य गोचर सुरु होणार आहे तर सूर्यदेव १५ जून २०२३ च्या संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत स्थिर राहणार आहेत. या सूर्य ग्रह गोचराचा राशीचक्रावर कसा प्रभाव पडणार आहे व कोणत्या राशींना कसा लाभ होणार आहे हे ही पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्य गोचराने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या कुंडलीत एकादश भावात सूर्याचा गोचर प्रभाव असणार आहे. येत्या काळात या राशीच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जुन्या मित्रांशी गाठभेटीचे संकेत आहेत, आर्थिक लाभाची दारे उघडणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद अनुभवता येऊ शकतो.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या गोचर कुंडलीत दशम स्थानी सूर्याचे गोचर प्रभावित असणार आहे. यामुळे येणारा काळ हा आपल्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. तुम्हाला वेळेच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतल्यास तुम्हाला प्रचंड यश लाभू शकते. कामाच्या ठिकाणी यश लाभल्याने तुम्हाला धनलाभ व परिणामी समाजात मान सन्मान मिळू शकते.

कन्या राशी (Kanya Rashi)

ग्रहांचा राजा सूर्य हा कन्या राशीच्या नवव्या स्थानी गोचर करत आहे. येत्या काळात तुम्हाला धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी लाभू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक झाल्याने हितशत्रू वाढण्याची शक्यता आहे. मात्र तुमच्या कामाच्या तेजामुळे तुमची प्रगती कोणालाही थांबवता येणार नाही. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला परदेशवारीचे सुद्धा योग तयार होत आहेत.

हे ही वाचा<< शनीदेव पुढील ३० महिने ‘या’ ५ राशींना देतील बक्कळ धनलाभ? शश राजयोगाने होऊ शकता करोडपती

मकर राशी (Makar Rashi)

मकर राशीच्या गोचर कुंडलीमध्ये सूर्य देवाचे गोचर पंचम स्थानी होत आहे. परिणामी तुमच्या राशीला आर्थिक पाठबळ लाभू शकते. नव्या नोकरीची संधी तुमच्याकडे चालून येऊ शकते. व्यवसायात सुद्धा प्रचंड यश लाभू शकते. तुम्हाला पोटाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी काही प्रयत्न करावे लागू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar after 365 days these four zodiac signs to get huge money and become crorepati in may astrology news svs