Sun Transit in Makar 2024: सूर्यदेव हा ग्रहमंडलातील सर्वात शक्तिशाली ग्रह आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, पिता, पुत्र, सरकारी कामं, यश, तेज, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा तो कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या राशीचा बदल एका विशिष्ट वेळेनंतर होतो, म्हणजेच सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. याला राशिचक्र संक्रमण म्हणतात. पंचांगानुसार, १५ जानेवारी २०२४ रोजी २ वाजून ३२ मिनिटांनी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. मकर संक्रातीला सूर्याच्या संक्रमणाचा सर्व १२ राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, अशा चार राशी आहेत ज्यासाठी हे सूर्य संक्रमण किंवा मकर संक्रांती खूप शुभ असणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने या राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार फायदा?

मेष राशी

सूर्यदेवाचे राशी परिवर्तन मेष राशीतील लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तुमच्या व्यवसायातील कमाई वाढून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Budh gochar in makar january
आता नुसती चांदी; बुधाचा शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार, भरपूर पैसा देणार
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?
magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!
Mars-Uranus 2025
मंगळ-यूरेनस ‘या’ तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती; ३६ तासानंतर मिळेल प्रत्येक कामात यश

(हे ही वाचा : फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींना मिळेल चांगला पैसा? शनि-बुध युती बनल्याने वर्षभरात होऊ शकता प्रचंड श्रीमंत )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना सूर्याचे संक्रमण शुभ परिणाम देऊ शकतात. यावेळी व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. 

कन्या राशी

सुर्यदेवाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येणारे ठरु शकते. या राशीच्या लोकांना या काळात पैसाच पैसा मिळण्याची शक्यता आहे. वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू तुमची भक्कम होऊ शकते. करिअरमध्ये उंच शिखर तुम्ही गाठू शकता. लव्ह लाईफमध्ये यश मिळू शकतं. समाजात मान सन्मान वाढू शकतो. 

(हे ही वाचा : Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या ७ चुका करु नये? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा )

धनु राशी

सूर्याचे संक्रमण धनु राशींच्या लाेकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरु शकते. तुमच्या खिशाचं वजन देखील वाढू शकेल. परदेशाशी व्यवसाय संबंधित असेल तर आर्थिक फायदा होऊ शकतो. सर्व कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धनसंपत्ती वाढण्याचे अनेक स्त्रोत मिळू शकतात. आर्थिक फायदासोबत मान सन्मान वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader