Surya Gochar in Makar Rashi : ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहाचा राजा मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम राशी चक्रातील १२ राशींवर दिसून येतो. असं म्हणतात जेव्हा सूर्य लोकांच्या कुंडलीमध्ये मजबूत स्थितीमध्ये असतो, तेव्हा त्या व्यक्तीला राज योगची प्राप्ती होते. सूर्याच्या अशुभ झाल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १४ जानेवारी २०२५ रोजी ग्रहांचे राजा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशात या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या अडचणी वाढू शकतात. जाणून घेऊ या सूर्य गोचर केल्याने कोणत्या राशींनी सर्तक राहणे आवश्यक आहे. (Surya gochar in Makar rashi will create problem for three zodiac they have to face financial problems)
मिथुन राशी (Mithun Rashi)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा गोचर आव्हानानी भरलेला असू शकतो. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मोठे आजारांकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या वैयक्तिक गोष्टींना इतरांबरोबर शेअर करू नका नाहीतर हे लोक अडचणीत येऊ शकतात. ऑफिसमध्ये या लोकांवर सीनिअर्सचे या लोकांवर विशेष लक्ष राहीन त्यामुळे या लोकांनी कोणतेही काम खूप काळजीपूर्वक करावे. घरी बोलताना शब्दांचा योग्य वापर करावा अन्यथा नात्यांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.
धनु राशी (Dhanu Rashi)
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी आणू शकतात. आईवडील आणि जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतात. छोट्या गोष्टींचे मोठ्या वादात रूपांतर करू नका. जवळचे लोक धोका देऊ शकतात. नोकर करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या विरोधात कट रचू शकतो. या लोकांनी त्यांच्या जबाबदार्या खूप काळजीपूर्वक सांभाळाव्यात.
कुंभ राशी (Kumbh Rashi)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात आव्हाने आणू शकतो. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. बजेटनुसार पैसा खर्च करावा. या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. जोडीदाराबरोबर गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे शांत राहणे आणि समजूतदारीने काम करणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रित करण्यासाठी योग आणि ध्यान करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे ध्यान भटकू शकते. अभ्यास करणाऱ्या लोकांनी फोकस ठेवावा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)