Surya Gochar 2023 Effect: अलीकडेच १५ मे ला सूर्यदेवाने वृषभ राशीत गोचर केले आहे. ज्योतिषीय भाषेत यात वृषभ संक्रांती असेही म्हंटले जाते. अभ्यासकांच्या माहितीनुसार सूर्यदेव येत्या १४ जून पर्यंत याच राशीत स्थिर असणार आहेत. अशातच धन- वैभव दाता शुक्र सुद्धा वृषभ राशीत प्रभावी आहे. या ग्रहस्थितिनुसार १२ राशींवर याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव दिसून येणार आहे पण चार अशा राशी आहेत ज्यांना सूर्याच्या तेजासम सोन्याचा दिवस अनुभवण्याची संधी मिळू शकते. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कशा प्रकारचा लाभ होण्याची स्थिती आहे हे पाहूया …
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीत शुक्र गोचर होणार आहे तर सध्याच्या सूर्य स्थितीनुसार कर्क ही अत्यंत लाभदायक स्थानी असणारी रास आहे. या काळात कर्क राशीच्या मंडळींना फार पूर्वीपासून पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद घेता येऊ शकतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीनुसार तुम्ही जेवढे इतरांना मदतीसाठी तयार व्हाल तितकं तुम्ही स्वतःला धनधान्याने समृद्ध झालेले पाहू शकता. अपात्री दान मात्र टाळावे. येत्या काळात माता लक्ष्मी व सूर्यदेव तुम्हाला करिअरमध्ये गरुडभरारी घेण्याचे बळ देऊ शकतात. तुम्हाला डोकं शांत ठेवून काम मार्गी लावायचे आहे ज्यातून तुम्ही धनवान होण्याची चिन्हे आहेत.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या गोचर कुंडलीत सूर्यदेव दहाव्या स्थानी विराजमान आहेत. यामुळे येत्या काळात तुमच्या नात्यांमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते. तुम्हाला मैत्रीभावनेने इतराना जिंकून घ्यावे लागेल. मनातून एखाद्यावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करा पण नंतर शंका घेऊ नका. तुम्हाला येत्या काळात करिअरला एक वेगळीच कलाटणी देता येऊ शकते. आजवर न केलेल्या कामात नव्याने पाऊल टाकण्याचा योग आहे. परदेश प्रवास किंवा व्यक्तींशी ओळख होण्याचा हा कालावधी आहे.
धनु रास (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या गोचर कुंडली स्वतः सूर्यदेव हे सहाव्या स्थानी विराजमान असणार आहेत. प्रभावाने तुमच्या डोक्यवरचा बराच ताण हलका होण्याचा योग आहे. जर वाडवडिलांच्या संपत्ती किंवा जमिनीच्या बाबत कोर्टात खटला सुरु तुमचा हिताचा निर्णय समोर येऊ शकतो. तुम्हाला पैसे कमावण्यासाठी योजना करण्यासह गुंतवणुकीवर भर देण्याची गरज आहे. तुम्ही नवनवीन लोकांच्या संपर्कात येऊ शकता ज्यामुळे तुमची अनेक कामे सहज होऊ शकतात. संवाद कौशल्याने इतरांची मने जिंकू शकता. जुना मित्र भेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे ही वाचा<< १६ दिवसांनी ‘या’ ४ राशीवर होणार बक्कळ धन वर्षाव? शुक्र गोचराने प्रेम व नाती चांदण्यासम खुलू शकतात
मीन रास (Pisces Zodiac)
मीन ही जल रास आहे. पण अनेकदा ही मंडळी एखाद्या कामात व भावनेत वाहत जाताना दिसतात. तुम्हाला चालता बोलता नियंत्रणाची गरज आहे. सूर्य देव आपल्या राशीत अगदीच तिसऱ्या स्थानी भ्रमण करणार आहे. यामुळे तुम्हाला जितके सूर्याचे तेज अनुभवता येईल तितकेच चटकेही सहन करावे लागू शकतात. निर्णय घ्या. तुम्हाला प्रचंड धनलाभ होत असला तरी यामुळे तुमचे हितशत्रू वाढण्याची शक्यता आहे यामुळे बँक व्यवहार, अधिकृत कामकाज स्वतः करण्यावर भर द्या. कौटुंबिक सुख तुमच्या राशीत उत्तम दिसत आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)