वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे, अशी मान्यता आहे. हा तेजस्वी ग्रह मनुष्याच्या इच्छेवर, चेतनेवर आणि संपूर्ण आत्म्यावर त्याचा प्रभाव असतो असं म्हणतात. येत्या १६ डिसेंबरला सूर्यदेव धनू राशीत प्रवेश करणार आहेत. सोबतच देव गुरु मेष राशीत विराजमान आहेत. त्यामुळे सूर्यदेवावर त्यांची नवम दृष्टी पडत आहे. यामुळे नवपंचम राजयोग तयार होतोय. हा राजयोग बनल्याने ‘राज लक्षण’ असा दुलर्भ राजयोग १२ वर्षांनी तयार होत आहे. हा राजयोग बनल्याने काही राशींना २०२४ मध्ये अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होणार?

मेष राशी

मेष राशींच्या लोकांना राज लक्षण योग बनल्याने मोठा फायदा होऊ शकतो. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. तुमचे अडकलेले काम मार्गी लागू शकतात. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. वैवाहिक जीवनात मधुरता वाढू शकते.

(हे ही वाचा : १०० वर्षानंतर दोन ‘शुभ राजयोग’ जुळून आल्याने जानेवारीपासून ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? बुधदेव देऊ शकतात बक्कळ पैसा )

सिंह राशी

राज लक्षण योग बनल्याने सिंह राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. व्यापार क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. या राशीतील लोकांच्या सुख, समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊन तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळू शकते. वडिलधाऱ्यांच्या मदतीने व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशीच्या मंडळींना राज लक्षण योग बनल्याने अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. कुटुंबातील सुख-सुविधांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणीही बरेच फायदे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader