Surya Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. तसेच राशीचा हा बदल काहींसाठी भाग्यवान तर काहींसाठी अशुभ आहे. मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य देव १५ जूनला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध पिता, प्रशासकीय पद आणि समाजातील आदराशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे राशीपरिवर्तन फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी.
वृषभ : सूर्यदेवाचे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत द्वितीय स्थानात भ्रमण करतील. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसंच जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही या काळात मजबूत होईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते आणि नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर तुमचा व्यवसाय सूर्य आणि शुक्र ग्रहांशी संबंधित असेल तर या काळात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो.
सिंह: सूर्य देवाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीपासून ११ व्या भावात असेल, ज्याला उत्पन्न आणि लाभाचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे आणि असे करणे तुमच्यासाठी या काळात फायदेशीर ठरू शकते. तसेच जे लोक प्रॉपर्टी डीलिंग आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील. यावेळी नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच सिंह राशीवर स्वतः सूर्य देवाचे राज्य आहे, त्यामुळे सूर्य देवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
आणखी वाचा : शुक्राच्या राशी परिवर्तनाने या लोकांच्या जीवनात धन-संपत्ती आणि रोमान्स वाढू शकतो!
कन्या : तुमच्या गोचर कुंडलीतून सूर्य देवाचे दशम भावात भ्रमण होणार आहे, ज्याला कर्मक्षेत्र आणि नोकरीचे घर म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. या दरम्यान तुमच्या कार्यशैलीतही सुधारणा होईल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायातही या काळात चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच वाहन आणि मालमत्तेचे सुखही मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीवर बुध ग्रहाचे राज्य असते आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीची भावना असते. त्यामुळे सूर्यदेवाचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही लोक पन्ना घालू शकता.