Tirgrahi Yog In Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करुन त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. अशातच आता आता सुमारे एक वर्षानंतर, १६ ऑगस्ट २०२४ रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतील तेव्हा बुध आणि शुक्र देखील त्याच राशीत असतील. अशा प्रकारे सिंह राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग तयार होईल. सिंह राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होईल. त्रिग्रही योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
कर्क राशी
त्रिग्रही योगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांना व्यापारात बक्कळ नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीची चिन्हे आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.
(हे ही वाचा : ७० वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; भोलेनाथांच्या कृपेने ‘या’ राशींचे आयुष्य होईल गोड, अचानक धनलाभाची संधी? तुमची रास आहे यात?)
तूळ राशी
त्रिग्रही योग बनल्याने तूळ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीसाठी फोन येऊ शकतो. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या मंडळींना त्रिग्रही योग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात. लोकांना व्यावसायिकांना काही विशेष काम पूर्ण करून फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मीडिया, कम्युनिकेशन आणि मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो. जे नोकरी शोधत आहेत त्यांना नव्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला सहकार्य करु शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)