Surya Grahan 2024 on Sarva Pitru Amavasya : या वर्षी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वर्षातील शेवटचे ग्रहण लागणार आहे. असं म्हणतात, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येला महालया अमावस्या असेही संबोधले जाते. यंदा २ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण आहे. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा परिणाम अमावस्येवर दिसून येणार नाही. त्यामुळे पितरांची पुजा करू शकता. (Surya graham 2024 on sarva pitru amavasya 2024 do we worship our our ancestors on this day)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वपित्री अमावस्याची वेळ (Sarva Pitru Amavasya Timing)

या वर्षी सर्व पित्री अमावस्या ही २ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी सूर्य ग्रहण लागणार असून सर्वपित्री अमावस्याचा मुहुर्त १ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होणार आणि ३ ऑक्टोबर रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी हा मुहुर्त समाप्त होईल. याच दिवशी सर्वार्थ सिध्दी योग निर्माण होणार आहे ज्याचा मुहुर्त २ ऑक्टोबर दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपासून ३ ऑक्टोबर सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत असणार.

धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध काळ सुमारे १६ दिवस असतो. 

हेही वाचा : Shukra Gochar 2024: धन-समृद्धीचा स्वामी शुक्र दसऱ्याला होणार गोचर, ‘या’ ३ राशींचे नशीब चमकणार; नोटांचा पडेल पाऊस

सूर्य ग्रहणाची वेळ (Surya Grahan 2024 Timing)

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरू होणार असून जो रात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ६ तास ४ मिनिटांचा असणार. हिंदू पंचागनुसार, या वर्षी दुसरे सूर्यग्रहण आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथिला आहे. हे सूर्यग्रहण हस्त नक्षत्र आणि कन्या राशीमध्ये लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे सुतक कालावधीचे नियम पाळणे बंधनकारक असणार नाही.

हेही वाचा : Numerology Prediction October 2024 : ऑक्टोबर महिन्यात या मूलांकावर होईल धनलक्ष्मीची कृपा! मिळेल प्रगती, यश, समृद्धीअन् आनंद

सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी सूर्य ग्रहणचा हा दिसून येईल परिणाम

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही पण अर्जेंटिना, प्रशांत महासागर, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, पेरू और फिजी, इत्यादी ठिकाणी दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya graham 2024 on sarva pitru amavasya 2024 do we worship our our ancestors on this day ndj