वैदिक पंचांगानुसार यंदा २४ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. मात्र यावर्षी दिवाळीच्या शुभ काळात एक विशेष संयोग तयार होणार आहे. दिवाळीच्या काळात सूर्यग्रहणही होणार आहे. सूर्यग्रहण नेहमी अमावास्येला होते आणि दिवाळीही अमावास्येच्या तिथीवर येते. यंदाचे सूर्यग्रहण ४ तास ३ मिनिटांचे असेल. या दरम्यान सूर्य तूळ राशीत असेल. ही सूर्याची दुर्बल राशी मानली जाते. हे सूर्यग्रहण भारतातही दिसणार आहे. हे ग्रहण काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. या काळात कोणत्या राशींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, तसेच ग्रहणाच्या सुतक काळाचा कालावधी काय असणार आहे हे जाणून घेऊया.

२०२२ सालातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे ग्रहण भारताच्या काही भागात खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. सूर्यग्रहण प्रामुख्याने युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिकामध्ये दिसेल. भारतात जिथे हे ग्रहण दिसणार आहे तिथे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व मानले जाईल. वैदिक पंचांगानुसार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होत आहे. सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुरू होईल. त्यामुळे २४ ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री २ वाजून ३० मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. हा सुतक काळ ग्रहण संपेपर्यंत राहील.

तब्बल ५९ वर्षांनी तयार होत आहेत पाच शक्तिशाली राजयोग; उघडणार ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे दार

१५ दिवसानंतर होईल दुसरे ग्रहण

ज्योतिषांच्या मते, २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण झाल्यानंतर १५ दिवसांनी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहणदेखील होईल. म्हणजेच १५ दिवसांत दोन ग्रहणांचा योगायोग होत आहे. हे चंद्रग्रहण मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार आहे, त्यामुळे हे ग्रहण दिसणाऱ्या भागात धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यता पाळल्या जातील.

सूर्यग्रहणाच्या काळात वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ या राशींच्या लोकांना काळजी घेणे गरजेचे आहे. या लोकांना शारीरिक अथवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच या काळात त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)