Surya Grahan 2022 : उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी होणार्‍या सूर्यग्रहणाबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. ग्रहणाबद्दल प्रत्येकाच्याच मनात भीती असते. यावर्षी एकूण ४ ग्रहण होणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहण तर २ चंद्रग्रहण असतील. भारतात फक्त एकच सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहणाचा परिणाम होईल. आज आपण उद्याच्या सूर्यग्रहणाबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खंडग्रास सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी तिथीनुसार वैशाख कृष्ण अमावस्या दिवशी शनिवारी मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रावर होईल. हे ऐकून मेष राशीचे लोक खूप अस्वस्थ होतील पण भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने काळजी करण्याची गरज नाही. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, अंटार्क्टिक, फॉकलंड, अर्जेंटिना, चिली, उरुग्वे, पॅराग्वे, बोलिव्हिया इत्यादी भागांवर या ग्रहणाचा प्रभाव पडेल. सागर पंचांगानुसार, खंडग्रास सूर्यग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल, ग्रहणाचा मध्य, मध्यरात्री २ वाजून १२ मिनिटांनी होईल तर मोक्ष १ मे रोजी पहाटे ४ वाजून ८ मिनिटांनी होईल.

Astrology : ‘या’ दिवशी जन्माला आलेल्या लोकांना मिळतो मान-सन्मान; जन्मवार आणि वेळेवरून जाणून घ्या आपलं नशीब

ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करण्यापासून प्रतिबंध केला जातो, जे अतिशय सामान्य आहे. ग्रहणाचा कोणताही प्रभाव नसतो, परंतु सर्व राशीच्या लोकांनी ग्रहण काळात आपल्या देवाकडे प्रार्थना करावी की आपले आराध्य दैवत सूर्यावर काही संकट आले तर ते दूर करावे. ग्रहण कालावधी खूप महत्वाचा आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. सूर्य हा आत्म्याचा करक आहे. सूर्य आरोग्य देतो. सूर्योदय होताच आपण सर्व सक्रिय होतो.

  • ग्रहण काळात सुतक नसल्यामुळे ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे सर्व पूजा सामान्य दिवसांप्रमाणेच कराव्या.
  • ग्रहण काळात देवावर लक्ष केंद्रित करून तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. ही ईश्वराप्रती आध्यात्मिक वृत्ती आहे.
  • एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवली पाहिजे की ग्रहण काळात संध्याकाळी मनोरंजन करू नये. भारतात ग्रहण दिसत नसले तरी चित्रपट पाहू नये, संगीत ऐकू नये, नृत्य करू नये. तुमचा देव संकटात आहे आणि तुम्ही मजा करत आहात, असे होऊ नये हेच या मागचे तर्क आहे.
  • जर कोणत्याही राशीची स्त्री गर्भवती असेल तर तिला ग्रहणाची भीती वाटण्याचे कारण नाही. तसेच त्यांना कोणतेही उपाय करावे लागणार नाहीत, फक्त भगवंताचे ध्यान आणि नामस्मरण करा, ते नेहमीच फायदेशीर ठरेल.
  • ग्रहण काळात झोपणे टाळावे कारण भगवंतावर संकट आले असताना झोपणे योग्य नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतने आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya grahan 2022 dont worry about solar eclipse these simple measures will be effective pvp