Surya Grahan 2022: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसंच, हे भारतातील वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल, जे दिसणार आहे, जे दिवाळीच्या आधी होणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य देव तूळ राशीमध्ये विराजमान होईल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे जीवन सर्वात जास्त प्रभावित होईल. यासोबतच इतर काही राशींवरही सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
सूर्यग्रहणाचा या राशींवर परिणाम होईल
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अधिक परिणाम होईल. या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासोबतच तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराज असाल. प्रयत्न करा की शक्य तितक्या लवकर याला सामोरे जा.
मिथुन राशी
सूर्यग्रहणाचा प्रभाव मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावरही अधिक राहील. तुम्हाला कोणत्याही कामासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉकेट मनीची विशेष काळजी घ्या.
( हे ही वाचा: २०२२ चे शेवटचे चार महिने ‘या’ राशींसाठी असतील खास; मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा)
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांचे जीवन देखील सूर्यग्रहणामुळे प्रभावित होईल. या राशीच्या लोकांनी आर्थिक स्थितीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनावश्यक खर्च वाढतील. यासोबतच तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर विचार करून सल्ला घेऊन करावी लागेल. अन्यथा घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी
या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होईल. तुम्हाला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गरज नसेल तर तिथे जास्त पैसे खर्च करू नका. तसेच, गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे गरजेचं आहे.
( हे ही वाचा: शनिदेव स्वतःच्या राशीत विराजमान असतील; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार)
तूळ राशी
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य याच राशीत राहील. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यासोबतच वाहन वगैरे चालवताना थोडी काळजी घ्या.
मकर राशी
या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण थोडे त्रासदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासोबतच बोलण्यावर थोडा संयम ठेवा, कारण बनवलेली गोष्ट खराब होऊ शकते. कोणत्याही कामात घाई करणे टाळा, अन्यथा सुरू असलेले कामही बिघडू शकते.