Grahan 2023: यंदा एकूण चार ग्रहण लागणार होती, ज्यापैकी पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी लागले, तर चंद्रग्रहण ५ मे रोजी रात्री लागले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आणखी दोन ग्रहण लागणार आहेत. क्वचितच घडणारा एक विशेष योगायोग म्हणूनही या खगोलीय घटनेचे वर्णन केले जात आहे. यंदाचा ऑक्टोबर महिना असा असणार आहे, ज्यामध्ये दोन ग्रहण लागणार आहेत. हे ग्रहण या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. या ग्रहणांची तारीख आणि वेळ सर्व काही जाणून घ्या.
ऑक्टोबरमध्ये लागणार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण
वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाबद्दल सांगायचे तर, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर, शनिवारी होणार आहे, जे एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे आणि त्याला रिंग ऑफ फायरदेखील म्हटले जाऊ शकते.
हे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक प्रदेशांसह अनेक भागांमधून पाहता येईल. याशिवाय, इतर पाश्चात्य देशांमधून सूर्यग्रहणाचा काही भाग पाहता येईल. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष चष्मा वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे धार्मिक कारणास्तव भारतात सुतक काळ वैध ठरणार नाही.
हेही वाचा – ३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस
२०२३ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक भागांतून पाहता येणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा हे घडते. हे ग्रहण रविवार २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १:०६ वाजता दिसेल आणि पहाटे २:२२ वाजता समाप्त होईल.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातून पाहिले जाऊ शकते, त्यामुळे त्याचा सुतक काळ धार्मिक आधारावर वैध असेल. नवी दिल्ली येथे २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१:४४:०५ वाजता ग्रहण दिसेल.