Surya Grahan 2023 Date and Time : सन २०२३चे पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला दिसणार आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख अमावास्येला वर्षाचे पहिले ग्रहण होणार आहे. दरवर्षी सूर्य आणि चंद्रग्रहणे होतात, ज्यांना विज्ञानामध्ये खगोलशास्त्रीय घटना मानले जाते. पण ज्योतिषशास्त्रामध्ये या खगोलशास्त्रीय घटनांचे विशेष महत्त्व असते. २० एप्रिल रोजी लागणारे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे हा कालावधी सुतककाळ म्हणून मानला जाणार नाही. पण सूर्यग्रहणाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर नक्की पडू शकतो. २० एप्रिलला होणाऱ्या या सूर्यग्रहणाला वैज्ञानिकांनी संकरित (हायब्रीड) सूर्यग्रहण असे नाव दिले आहे. चला जाणून घेऊ या वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणासंबंधी माहिती.
२०२३ सालचे पहिले सूर्यग्रहण कधी आहे?
वैशाख महिन्यातील अमावास्येला २०२३ सालचे पहिले ग्रहण होणार आहे. वर्षातील हे पहिले ग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.०४ वाजता सुरू होईल. हे सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी दुपारी १२.२९ वाजता संपेल. अशा प्रकारे ग्रहणाचा कालवधी पाच तास २४ मिनिटांचा असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण उर्वरित जगामध्ये ते सहज पाहता येणार आहे.
हेही वाचा : १०० वर्षांत पहिल्यांदा दिसणार ‘हायब्रीड सूर्यग्रहण’, काय आहे वेगळं? तुमच्यावर काय होईल का परिणाम? जाणून घ्या
सूर्यग्रहण कसे असेल?
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, वर्षातील पहिले सूर्यग्रहण तीन प्रकारांत दिसेल. ज्यामध्ये ते आंशिक, पूर्ण आणि कंकणाकृती स्वरूपात असेल. अशा प्रकारे २०२३ चे हे पहिले सूर्यग्रहण संकरित सूर्यग्रहण असेल, कारण जेव्हा सूर्यग्रहण आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती स्वरूपात असते तेव्हा त्याला संकरित सूर्यग्रहण म्हणतात. आंशिक सूर्यग्रहणादरम्यान, चंद्र सूर्याचा एक छोटासा भाग व्यापतो. दुसरीकडे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही एकाच सरळ रेषेत असताना संपूर्ण सूर्यग्रहण होते. अशा स्थितीत पृथ्वीच्या एका भागात काही काळ पूर्ण अंधार असतो. याशिवाय जेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते तेव्हा ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो आणि सूर्य एका तेजस्वी वलयासारखा दिसतो. या प्रकारच्या सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर म्हणतात.
सूर्यग्रहणाचा प्रभाव
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतककाळ वैध ठरणार नाही. सुतक काळ हा अशुभ काळ मानला जातो. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या १२ तास अगोदर सुतक कालावधी सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य, पूजा आणि भोजन वगैरे केले जात नाही. सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व लोकांवर पडतो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना प्रभावित करू शकते.
सूर्यग्रहण २०२३
सूर्यग्रहण किती काळ आहे?
पहिले सूर्यग्रहण (२० एप्रिल २०२३, गुरुवार) सकाळी ७.०४ पासून ते दुपारी १२.२९ पर्यंत
सुतककाळ – सुतककाळ भारतात वैध नाही
दुसरे सूर्यग्रहण (१४ ऑक्टोबर २०२३ शनिवार) – भारतात दिसणार नाही
सुतककाळ – सुतककाळ भारतात वैध असणार नाही
हेही वाचा : २०० वर्षांनी गुरू, शुक्र आणि शनीदेवाची युती; ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा
चंद्रग्रहण २०२३
चंद्रग्रहण किती काळ आहे?
पहिले चंद्रग्रहण – (०५ मे २०२३) रात्री ०८.४५ पासून ते ०१.०० वाजेपर्यंत
छाया चंद्रग्रहणामुळे सुतक कालावधी वैध असणार नाही
दुसरे चंद्रग्रहण (२९ ऑक्टोबर) दुपारी ०१.०६ ते ०२:२२ पर्यंत
सुतक कालावधी – ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत असेल