Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलंय. त्याच्या प्रत्येक हालचालीचा जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर मोठा प्रभाव पडताना दिसतो. आता शनिदेव या वर्षातील दुसऱ्या आणि शेवटच्या सूर्यग्रहणानंतर म्हणजेच १५ ऑक्टोबरला नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. या शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभाव सर्व राशींवर पडणार असून मात्र, काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या राशी…
‘या’ राशींना मिळणार अपार पैसा?
मेष राशी
शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात या लोकांना अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या राशीतील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच या राशीतील लोकं या काळात सोनेही खरेदी करु शकतात.
(हे ही वाचा: यंदाची दिवाळी ‘या’ पाच राशींच्या लोकांची होणार गोड? शुक्रदेवाच्या कृपेने महिनाभर मिळू शकतो पैसाच पैसा)
मिथुन राशी
मिथुन राशीतील लोकांवर या काळात शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशीतील मंडळींना मोठे यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमही होऊ शकतात.
वृश्चिक राशी
शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन होताच वृश्चिक राशीतील मंडळींना सुखाचे दिवस अनुवता येऊ शकतात. या दिवसात शनिदेवाचा आशीर्वाद या राशीतील लोकांवर असू शकतो. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊन या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या वाणीने अनेक कामांमध्ये यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)