Surya Grahan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ ला झाले तर आता दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबरला
आहे. या दिवशी सर्वपित्री अमावास्याही आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा याचा थेट शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडतो. वर्षाच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊ या.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, १४ ऑक्टोबरला असणारे सूर्यग्रहण मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर नाही आणि या राशींच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असं म्हणतात की या दरम्यान या राशीच्या व्यक्तींनी कोणावर विश्वास ठेवू नये. असे मानले जाते की नोकरीच्या ठिकाणी या लोकांना अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागेल.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक हानी पोहचवू शकते. असं म्हणतात की या राशीच्या लोकांनी स्वत:च्या वाणीवर नियंत्रण ठेवावे आणि मौल्यवान गोष्टी सांभाळून ठेवाव्यात. असे मानले जाते की या काळात या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते.

हेही वाचा : पाच दिवसानंतर बदलणार ‘या’ राशींचे नशीब, बुध देणार नवी नोकरी, प्रमोशन आणि मुबलक पैसा?

सिंह

असं म्हणतात की सिंह राशीसाठी हे सूर्यग्रहण अशुभ असणार आहे आणि या राशीच्या लोकांना मानहानी होण्याची शक्यता अधिक आहे. असे मानले जाते की या राशींच्या लोकांचा खर्च वाढणार आहे आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पैशांचा व्यवहार करताना या लोकांनी काळजी घ्यावी.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीसाठी हे सूर्यग्रहण अशुभ असणार आहे. या दरम्यान या राशींच्या लोकांनी मित्रांपासून सावध राहावे, असं म्हणतात. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक हानी होऊ शकते आणि मानसिक त्रास वाढू शकतो.

हेही वाचा : बारा राशींनुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते?

तूळ

तूळ राशीच्या लोकांवर या सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे, असे मानले जाते. या राशीच्या लोकांना मानसिक त्रास होऊ शकतो आणि वादविवाद वाढू शकतात, असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे आर्थिक व्यवहार त्यांनी सांभाळून करावेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader