Solar Eclipse 2024 Date and Time India : हिंदू धर्मामध्ये ग्रहाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी चंद्र ग्रहणाबरोबर सूर्यग्रहण सुद्धा दिसून येते. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यमालेत सूर्य स्थिर असतो आणि इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरतो. या दरम्यान अशी एक वेळ येते की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. यामुळेच सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश काही वेळेसाठी खंडित होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात. या वर्षीचे पहिले सूर्य ग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी होते पण ते भारतात दिसले नाही. या ग्रहणाचा परिणाम राशिचक्रातील बारा राशींवर दिसून आला होता. आता या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असून पितृपक्षाच्या अमावस्येला दिसून येईल. सुर्यग्रहणाची वेळ आणि तारीख कोणती? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
कधी आहे या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण? (Solar Eclipse 2024 Date and Time)
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४ आहे. या दिवशी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी हे सूर्यग्रहण ग्रहण सुरू होणार असून जो रात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार. या ग्रहणाचा कालावधी ६ तास ४ मिनिटांचा असणार. हिंदू पंचागनुसार, या वर्षी दुसरे सूर्यग्रहण आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथिला दिसून येईल. या दिवशी पितृपक्ष अमावस्या आहे.
या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?
या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी आहे त्यामुळे ते भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहण दरम्यान सूतक काळ पाळायचा का?
हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सुतक कालावधी वैध राहणार नाही. सुतक कालावधीचे नियम पाळणे बंधनकारक असणार नाही. या कालावधीत मंदिरे किंवा कपाट बंद ठेवतात. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केली जात नाही.
या वर्षी कुठे दिसणार हे सूर्यग्रहण?
दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाही पण त्या दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना फिजी, चिली, न्यूझीलंड, ब्राझील, मेक्सिको, पेरू आणि पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडील भागात दिसणार.
सूर्यग्रहण दरम्यान कोणत्या राशींना लाभ मिळणार अन् कोणत्या राशींनी काळजी घ्यावी?
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात दिसून येईल. तसेच याच दिवशी चंद्राबरोबर बुध आणि केतू विराजमान राहील. गुरू आणि मंगळाची पूर्ण दृष्टी दिसून येईल. सूर्याच्या दुसर्या स्थानावर शुक्र, सहाव्या स्थानावर वक्री शनि विराजमान राहणार. अशात काही राशींना लाभ मिळू शकतो. या सूर्य ग्रहणाचा मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि धन लाभ मिळू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागतील.
याशिवाय मेष, वृषभ, सिंह, मीन राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना किंवा कोणत्याही यात्रेदरम्यान सतर्क राहा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. या दरम्यान या लोकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये नाही तर यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.