Surya Grahan 2024: गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल रोजी साजरा होत आहे. तर हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी ८ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिल रोजी रात्री ०८:३० वाजता संपेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या ठीक एक दिवस आधी म्हणजे ८ एप्रिलला होत आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अन्यन साधारण महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मतानुसार, काही राशींना या ग्रहणामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी….

‘या’ राशीचं भाग्य सूर्यसारखं चमकणार? 

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्य ग्रहण आर्थिक लाभ घेऊन येणारे ठरु शकते. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरु शकतो. या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

(हे ही वाचा : होळीनंतर शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? शनि महाराज नक्षत्र बदल करताच कुणाचं नशीब उजळणार? )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहण फायदेशीर ठरु शकते. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकते. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader