Surya Grahan 2024: वर्षातील पहिले आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण चैत्र नवरात्रीच्या आधी म्हणजेच ८ एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण अतिशय खास मानले जाते, कारण ते सुमारे ५ तास २५ मिनिटे चालणार आहे. सूर्यग्रहणाच्या काळात अनेक ग्रहांच्या स्थितीत तसेच पंचकांमध्येही बदल होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि राहू कोणत्याही राशीत एकत्र असल्यास ग्रहण योग तयार होतो, जो अशुभ योगांपैकी एक मानला जातो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशीतील कृष्ण आणि चैत्र महिन्यात रेवती नक्षत्रात होणार आहे. सूर्यग्रहण काही राशींसाठी फलदायी ठरू शकते, तर काही राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, जाणून घ्या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी रात्री ०९.१२ ते ०९ एप्रिल ०२.२२ पर्यंत होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु ग्रहणाचा १२ राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. याचबरोबर तब्बल ५४ वर्षांनंतर अनेक दुर्मीळ योगायोग घडणार आहेत, असे सूर्यग्रहण १९७० मध्ये झाले होते. याशिवाय सूर्यग्रहणाच्या वेळी धूमकेतू, शुक्र आणि गुरु ग्रहही प्रत्यक्ष पाहता येतील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरणार नाही. या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कोणताही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी थोडा विचार करा. याचबरोबर तुम्हाला विनाकारण सगळ्या गोष्टींची चिंता सतावू शकते. छोट्या-छोट्या कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असू शकतात. अशा परिस्थितीत एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबाबरोबर काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. याचबरोबर सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे नातेसंबंध बिघडू शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनीही थोडे सावध राहणे आवश्यक आहे. नोकरीत तुम्हाला अधिक दबाव जाणवू शकतो. याचबरोबर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टींमुळे तुम्हाला चिंता सतावू शकते. अशा परिस्थितीत नोकरी बदलण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. कामानिमित्त तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. अशा स्थितीत मतभिन्नतेमुळे वादावादी होण्याची शक्यता आहे. सूर्यग्रहण आरोग्याच्या दृष्टीनेही शुभ ठरणार नाही, त्यामुळे थोडे सावध राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मित्रांच्या माध्यमातून आयुष्यात काही अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. याचबरोबर वरिष्ठांकडून अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान होण्याचीही दाट शक्यता आहे, अशा स्थितीत चिंता वाढेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more sjr