Surya Grahan 2025 And Shani Gochar : वैदिक पंचागानुसार, २९ मार्च रोजी शनीदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहणदेखील होणार आहे, ज्यामुळे सूर्यग्रहण आणि शनी गोचरमुळे दुर्मीळ संयोग होणार आहे, ज्यामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया, या भाग्यवान राशींविषयी…

शनी गोचर अन् सूर्यग्रहणाच्या संयोगाने ‘या’ तीन राशींचे लोकांना येणार ‘अच्छे दिन’

मिथुन

शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. हा संयोग विद्यार्थ्यांनाही फलदायी ठरू शकतो. दुसरीकडे जर कोणी सरकारी नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेला बसत असेल, तर त्याला यावेळी लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी व्यापाऱ्यांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो.

वृषभ

शनी गोचर आणि सूर्यग्रहण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच ही परिस्थिती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला विविध स्रोतांद्वारे संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी मिळेल.

मकर

शनी गोचर आणि सूर्यग्रहण मकर राशीसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तसेच मार्चनंतर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. त्याच वेळी, वेळोवेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला शनीदेवाच्या साडेसातीपासून आराम मिळेल.