Surya Grahan 2025 And Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, होळीनंतर सूर्यग्रहण आणि सूर्य आणि शनीची एकाच वेळी युती होणार आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम २९ मार्च रोजी शनीदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील. २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत शनीचे गोचर होत आहे, तर याच ग्रहांचा राजा सूर्यदेखील स्थित होत आहे. यामुळे शनी- सूर्य युतीदेखील होईल. यासह वर्षातील पहिले सूर्यग्रहणदेखील २९ मार्च रोजी होणार आहे, ज्यामुळे सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचरामुळे एक दुर्मीळ संयोग निर्माण होईल, या संयोगामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभासह सुख-समृद्धी लाभू शकते. नेमक्या कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते जाणून घेऊ…
धनू
सूर्यग्रहण आणि सूर्य-शनीची युती धनू राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतात. तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा उत्तम योग आहे. या काळात तुमच्या पैशांशी संबंधित समस्या सोडवल्या जाऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केल्यास तुमचे उत्पन्न अधिक वाढू शकते. तसेच या काळात, तुमचे सासू-सासऱ्यांशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील.
मिथुन
शनी गोचर आणि सूर्यग्रहणाच्या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती साधता येऊ शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यतादेखील असेल. यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते.
कर्क
सूर्यग्रहण आणि शनीचे गोचर कर्क राशीच्या लोकांना फलदायी ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची कमाई पूर्वीपेक्षा दुप्पट होईल. या काळात व्यापाऱ्यांना नफ्याच्या अनेक विशेष संधी मिळतील. तुम्हाला कामानिमित्त विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल. तुमची आवड धार्मिक कार्यात अधिक असेल. यावेळी स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते.