या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल. शनिवारी येणाऱ्या या अमावस्यामुळे शनि अमावस्येचा योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करणं फलदायी असतं. त्यामुळे हे ग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सूर्यग्रहण मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत चालेल. सूर्य ग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही किंवा तो सुतक काळ मानला जाणार नाही. ग्रहण दक्षिण अमेरिकेचा नैऋत्य भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे.

वृषभ: या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. करिअरमध्ये यश मिळू शकते. तसेच अपूर्ण कामेही करता येतील. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

कर्क: हे ग्रहण यश देणारे ठरू शकते. या दरम्यान तुम्हाला कामात यश मिळेल. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुमची कामाच्या ठिकाणी आणि समाजात चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

१२ दिवसानंतर शनि करणार राशी बदल, साडे सात वर्षांनंतर धनु राशीला मिळणार दिलासा!

धनु: तुमची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल. हे ग्रहण सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही शुभ आणि फलदायी ठरेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला पैसे मिळू शकतात.