30 April Surya Grahan Lucky Zodiac Signs: २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होत आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. तसंच दुसरे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. ३० एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल, जे पहाटे ०४.०७ पर्यंत चालेल. हे ग्रहण मेष राशीत होईल. भारतामध्ये सूर्यग्रहण न दिसणार असल्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही.
सूर्यग्रहण कुठे दिसेल ?
३० एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकाच्या नैऋत्य भागात दिसणार आहे.
३० एप्रिल २०२२ च्या भाग्यशाली राशी
आपल्या जीवनावर ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. हा ग्रह पिता आणि आत्म्याशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाची स्थिती शुभ मानली जात नाही. पण, ग्रहणांचा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. ३० एप्रिलच्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घ्या-
कर्क- ३० एप्रिल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस असणार आहे. या दिवशी तुम्हाला कामात यश मिळेल. मित्रांकडून फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. ग्रहण काळात तुमचे नशीब बलवान असेल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त आव्हानांना सामोरे जाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
आणखी वाचा : १०० वर्षांनंतर सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकाच दिवशी, या ३ राशींना धनलाभाची प्रबळ शक्यता
तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामात यश मिळेल. तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकाल. मेहनतीचे फळ मिळेल.
धनु – धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हे ग्रहण फायदेशीर ठरेल. परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात.
आणखी वाचा : Surya Grahan 2022: 30 एप्रिलला होणार सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ, सुतक कालावधी आणि उपाय
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहील. ग्रहणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. अनेक अपूर्ण व्यवसाय असतील. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.