Shadashtak Yog 2025: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो, त्यामुळे त्याचा प्रभाव १२ राशींवर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. सूर्य हा नवग्रहातील महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दुसरीकडे, देवांचा गुरू, बृहस्पति सुमारे १वर्षानंतर राशिचक्र बदलतो, ज्याला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत दोन्ही शुभ ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे नवीन वर्ष २०२५मध्ये षडाष्टक नावाचा राजयोग तयार होत आहे.सामान्यतः षडाष्टक हा अत्यंत विनाशकारी योग मानला जातो.परंतु या शुभ ग्रहांचे एकमेकांपासून १५०अंशांच्या अंतरामुळे नवीन वर्षातकाही राशींचे नशीब चमकू शकते. कोणत्या राशींसाठी सूर्य गुरु ग्रहांनी तयार केलेला षडाष्टक राजयोग नवीन वर्ष २०२५ मध्ये शुभ ठरू शकतो चला जाणून घेऊ या…

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह १५० अंशांच्या अंतरावर असतात किंवा एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या घरात असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. हा योग अत्यंत क्लेशदायक आहे. पण कधी कधी त्याचा सकारात्मक परिणामही होतो. जर आपण गुरू आणि सूर्याबद्दल बोललो तर ते एकमेकांपासून १५- अंशांच्या अंतरावर स्थित असतील. अशा परिस्थितीत षडाष्टक योग काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Shani Margi 2024
Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीमध्ये मार्गी! ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार धन अन् पैसा
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

हेही वाचा – Budh Ast 2024: ३० नोव्हेंबरला तूळसह २ राशींचे भाग्य उजळणार, जबरदस्त लाभाचा योग! तुमची रास आहे का यात?

मेष राशी (Mesh Zodiac)
मेश राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग लाभदायी ठरू शकतो. या राशींच्या लोकांची दिर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. भाग्याची संपूर्ण साथ मिळणारे योग दिसून येत आहे. करिअरमध्ये सकाराक्मक प्रभाव पडू शकतो . कामासंबधीत कित्येक प्रवास यात्रा कराव्या लागतील पण त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पदोन्नतीसह वेतन वाढीचा योग तयार होऊ शकतो. व्यापार क्षेत्रामध्ये खूप फायदा होऊ शकतो. नवीन वर्षात तूम्ही जास्तीत जास्त धन कमावू शकता. तसेच पैशांची बचत देखील करासल. जोडीदाराबरोबर चांगला काळ घालवाल. नात्यांमध्ये दृढता पाहायला मिळेल.

हेही वाचा – Surya Dev Favourite Rashi: सूर्यदेवाच्या कृपेने सूर्यासारखे चमकते ‘या’ तीन राशींचे नशीब, कधीही येत नाही संकट

मिथुन राशी (Mithun Zodiac)
या राशीच्या लोकांना खूप लाभ मिळू शकतो. तसेच धनलाभाचा योग दिसून येत आहे. तुम्ही एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करत असाल तर २०२५मध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. करिअरमध्ये तुम्ही उत्साहाने काम करू शकता. आत्मविश्वास आणि धाडस वाढेल ज्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यश मिळू शकते. व्यवसायासंबधीत प्रवास करावा लागेल पण त्याचा सकारात्मक लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली असल्याने बचत करण्यात यश मिळेल. आरोग्य चांगले राहिल.

हेही वाचा – Shukra Gochar 2024 : २ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, मिळणार पैसाच पैसा अन् धन

मकर राशी (Makar Zodiac)
या राशीच्या लोकांना अप्रत्याक्षित धन लाभाचे योग दिसू शकतात. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
नोकरीच्या संदर्भात कित्येदा प्रवास करावा लागू शकतो. थोड्या दबावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. कुटुंबासह चांगला वेळ जाईल.मुलांच्या बाजूने ताणतणाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येऊ शकते.आरोग्याबाबत थोडे सावध राहा.