Surya Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवरदेखील विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या सूर्य त्याची स्वराशी असलेल्या सिंह राशीत असून तो १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने कन्या राशीत आधीपासून उपस्थित असलेल्या केतूची सूर्याबरोबर युती निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीमध्ये सूर्य आणि केतूची ही युती तब्बल १८ वर्षानंतर बनत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्याला साहस, पिता आणि आत्म्याचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य आणि केतूच्या संयोगाने ग्रहण योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु, काही राशीच्या व्यक्तींसाठी हा योग चमत्कारी बदल घडवून आणेल.

सूर्य-केतूची युती करणार कमाल (Surya Ketu Yuti)

मेष

सूर्य आणि केतूच्या युतीचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. धन, सुख-समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. समाजात मान-सन्मान वाढेल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग चमत्कारी परिणाम देणारा ठरेल. या काळात चांगले बदल पाहायला मिळतील. अनेक आकस्मिक धनलाभ होतील. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

सिंह

सूर्य-केतूचा संयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होईल. या काळात सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल, विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल. कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिकांना नवी संधी उपलब्ध होईल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

हेही वाचा: दिवाळीपासून कमावणार पैसाच पैसा; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींवर असणार शनिची कृपा

धनु

सूर्य-केतूची युती धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजातील लोक तुमचे कौतुक करतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya ketu yuti 24 september due to the influence of surya ketu conjunction the destiny of these three zodiac signs will happy sap