Surya Mangal Pratiyuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे. त्याच्या राशिबदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडत असतो. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हादेखील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून १८० अंशांवर असतील; ज्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे. ज्यामुळे १२ राशींपैकी तीन राशींचे जीवन सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या प्रतियुती योगामुळे बदलू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रतियुती योग ‘या’ राशींना करेल मालामाल, नोकरी, व्यवसायात मिळवून देईल यश

कन्या

प्रतियुती योग कन्या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल, तुम्हाला कामानिमित्त अनेकदा प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या योगाच्या मदतीमुळे तुम्ही अधिकाधिक पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा – १४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

तूळ

सूर्य आणि मंगळ ग्रहामुळे तयार होणारा प्रतियुती योग तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते. सुख-सोई झपाट्याने वाढू शकतात. त्यासह तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. करिअरमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते; तसेच नफाही मिळू शकतो. व्यवसायात तुम्ही बनवलेले धोरण प्रभावी ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होईल आणि तुमचा व्यवसाय वेगाने पुढे जाईल. तुमची पैसे कमविण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. यासह तुम्ही बचतदेखील करू शकाल. नात्यात गोडवा राहील.

धनू

सूर्य आणि मंगळाच प्रतियुती योग धनू राशीच्या लोकांसाठीही आनंद देणारा ठरू शकतो. या राशीच्या लोकांना सूर्य देवाच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती साधता येऊ शकते. त्यासह तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमधून तुम्हाला बरेच यश मिळू शकते. त्यासह जर तुम्ही पैसे हुशारीने खर्च केलेत, तर तुम्हाला उत्पन्नात झपाट्याने वाढ दिसून येईल. नातेसंबंधात आनंदाचे क्षण येतील. आरोग्यही चांगले राहील.