Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशी परिवर्तन होते. जूनमध्ये सूर्य, बुध, शुक्र, मंगळ व शनि या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. तसेच या महिन्यात बुध, सूर्य, शुक्र शुभ संयोग निर्माण करतील. पंचांगानुसार १२ जून रोजी मिथुन राशीत शुक्र; तर १४ जून रोजी बुध ग्रह या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १५ जून रोजी सूर्य देखील मिथुन राशीत प्रवेश करेल. या तीन ग्रहांच्या मिथुन राशीतील प्रवेशाने या राशीत त्रिग्रही राजयोग निर्माण होईल. सोबतच सूर्य-बुध ग्रहाच्या युतीने ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. तसेच बुध-शुक्र ग्रहाच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल. या तीन ग्रहांच्या संयोगाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

मेष

मिथुन राशीतील तीन ग्रहांच्या संयोगाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नत्तीही मिळेल.

मिथुन

मिथुन राशीतच हे शुभ संयोग निर्माण होणार असून, या राशीच्या व्यक्तींना समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनाही या शुभ संयोगाचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. करिअरमध्ये यश प्राप्त होईल. या काळात नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

हेही वाचा: पुढचे १३ दिवस होणार देवी लक्ष्मीची कृपा; बुध ग्रह करणार कमाल, ‘या’ पाच राशींचे लोक होणार जबरदस्त मालामाल

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)