Surya Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव एका ठराविक काळानंतर राशिस्थान बदलतो. हा बदल सूर्य दर महिन्याला करीत असतो. या घटनेचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडतो. सूर्यदेव दरमहा राशिबदलाबरोबर नक्षत्रही बदलतो. सूर्याच्या नक्षत्रबदलाने १२ राशींच्या जीवनावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. यावेळी सूर्य चित्रा नक्षत्रात स्थित आहे; पण धनत्रयोदशीपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबरला तो चित्रा नक्षत्रातून स्वाती नक्षत्रात प्रवेश करील. राहूच्या नक्षत्रात सूर्याने प्रवेश केल्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते; तर काही राशींच्या लोकांना काळजी घेण्याची गरज भासू शकते. चला तर जाणून घेऊ सूर्याच्या स्वाती नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आहे.

द्रिक पंचांगनुसार, सूर्य २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १२.५२ वाजता स्वाती नक्षत्रात प्रवेश करील आणि तो ६ नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. आकाश मंडलानुसार स्वाती हे २७ नक्षत्रांपैकी १५ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. या नक्षत्रात सूर्य असल्यामुळे करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होतो. तसेच अनेकांना जीवनात यश मिळते.

मेष (Mesh Rashi)

सूर्याचा नक्षत्रबदल मेश राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या काळात मेश राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच त्यांचा भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुमचे दिवस चांगले जाणार आहेत. वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळू शकेल. त्यासह तुम्ही केलेल्या मेहनत आणि कामाबद्दल सर्वांकडून तुमचे कौतुक होईल. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमचे प्रेमी जीवन चांगले राहील. याद्वारे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. आरोग्यही चांगले राहील.

वृषभ (Vrishabha Rashi)

सूर्याचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातही आनंदाचे क्षण घेऊन येईल. या काळात या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल प्रभाव पाहायला मिळणार आहे. करिअरबद्दल बोलायचे झाले, तर मेहनतीच्या जोरावर तुम्हाला प्रमोशन, तसेच बोनस, इन्क्रिमेंट आणि प्रोत्साहन मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाऊ शकतो. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर या कालावधीत असे करणे फायदेशीर ठरू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. आरोग्य चांगले राहील.

तूळ (Tula Rashi)

सूर्याचा नक्षत्रबदल तूळ राशीच्या लोकांसाठीही फलदायी ठरू शकतो. या काळात तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळूू शकते. आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कामासंदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो; पण तुम्हाला याचा फायदाही मिळू शकतो. व्यवसायातही चांगला फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहील. प्रेम जीवनातही आनंद येऊ शकतो.