Surya Rohini Nakshatra Parivartan: काल म्हणजेच २५ मेला मध्यरात्री सूर्याने नक्षत्र परिवर्तन करून चंद्राच्या प्रिय नक्षत्रात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात गोचर केले आहे. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे येत्या काळात काही राशींच्या कुंडलीला झळाळी मिळण्याचा योग आहे. सूर्याचे हे स्थान पुढील ९ दिवस कायम असणार आहे. या काळात काही राशींना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळू शकते तसेच आर्थिक स्रोत वाढून धनलाभही होऊ शकतो. २५ मे ते २ जून या कालावधीत नक्की कोणत्या राशींना कशाप्रकारे लाभ होऊ शकतो हे आपण जाणून घेऊया. तसेच या नशीबवान राशींमध्ये तुमच्या राशीचाही समावेश असले तर तुम्ही कोणती काळजी घेणे महत्त्वाचे ठरू शकते हे सुद्धा जाणून घेऊया…
सूर्य नक्षत्र परिवर्तन ‘या’ राशींसाठी आणू शकते शुभ प्रभाव
मेष रास (Aries Zodiac)
सूर्य रोहिणी नक्षत्रात असताना पुढील नऊ दिवस मेष राशीची आर्थिक स्थिती खूप सुधारू शकते. या राशीच्या मंडळींना आर्थिक कक्षा रुंदावल्याचे अनुभवता येऊ शकते. तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. तसेच जोडीदार व नातेवाईकांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला पोटाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या मंडळींना सूर्य नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. आपल्यातील नेतृत्व कौशल्य जगासमोर यायला हा शुभ काळ ठरू शकतो. तसेच आपल्याला संवादकौशल्य सुधारून व्यक्तिमत्वाला झळाळी देण्याची एखादी संधी येऊ शकते. तुमच्या बोलण्याने काही कामे मार्गी लागू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्यासाठी उत्तम वेळ आहे. नोकरीमध्ये पगारवाढ मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढल्याने तुमच्यावर अनेकजण विश्वास टाकू लागतील.
कर्क रास (Cancer Zodiac)
रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे कर्क ही चंद्रप्रिय रास म्हणून ओळखली जाते. यामुळे येत्या काळात कर्क राशीच्या मंडळींना मोठा व अनपेक्षित धनलाभ होण्याचा संकेत आहे. करिअरमध्ये एखादीच मोठी झेप घेऊन तुम्ही अनेक स्वप्न पूर्ण करू शकता. आर्थिक कक्षा रुंदावल्याने तुम्हाला जीवनशैलीत बदल अनुभवता येऊ शकतो. नवीन कामाची व व्यवसायाची सुरुवात करू शकता.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन झाल्याने सिंह राशीला नशिबाची मोठी साथ मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यांना येत्या काळात मोठी प्रगती अनुभवता येऊ शकते. करिअरसाठी तुम्हाला मोठी संधी आहे या प्रगतीतूनच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. पण आपण कामामध्ये खूप व्यग्र राहू शकता, यामुळे तब्येतेची हेळसांड होऊ शकते याकडे विशेष लक्ष द्या.
हे ही वाचा<< शनी- सूर्य एकत्र येताच ‘या’ ४ राशींना सुखाचे दिवस? ‘या’ रुपात सूर्यासम तेज व बक्कळ धनलाभाची संधी
धनु रास (Sagittarius Zodiac)
धनु राशीसाठी सूर्य नक्षत्र परिवर्तन शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकते. शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची सिद्ध होऊ शकते. वाडवडिलांच्या गुंतवणुकीचा सुद्धा मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो. उन्हाळामुळे आरोग्याला होणारा त्रास टाळण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)