ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य हा पिता, आत्मा, नोकरी आणि धैर्याचा कारक मानला जातो. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. १४ मे रोजी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचे गोचर तीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. सूर्याच्या राशी बदलामुळे कोणत्या तीन राशींना फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष –

वृषभ राशीतील सूर्याचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. सूर्य तुमच्या संपत्तीच्या स्थानात प्रवेश करणार आहे. सुर्याच्या राशी बदलामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. शिवाय अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कष्टकरी लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. तसेच तुमच्या कार्यशैलीने लोक प्रभावित होऊ शकतात.

हेही वाचा- गुरूदेव अश्विनी नक्षत्रात झाले शक्तिशाली; ‘या’ राशींना मिळणार चौपट श्रीमंती? मान सन्मान वाढण्याची संधी

सिंह –

सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे. त्यामुळे सूर्य राशी बदल तुमच्यासाठी खूप शुभ ठरु शकतो. सुर्याचे गोचर तुमच्या कर्म स्थानी होणार असल्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. या काळात व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.

हेही वाचा- आज शुक्र गोचर होताच ३० मे पर्यंत ‘या’ राशींना होणार धनलाभ? कोट्यवधींचे मालक होण्याची संधी येऊ शकते दारी

कन्या –

कन्या राशीच्या नवव्या स्थानी सूर्य गोचर होणार आहे. ज्याचा कन्या राशीतील लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात नशिबाने साथ दिल्याने अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. प्रवासादरम्यान फायदा होऊ शकतो. शिवाय व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ ठरु शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya rashi parivartan 2023 from may 15 thise zodiac sign will be rich surya enters taurus sign one can get huge money jap