Surya Rashi Parivartan 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर एक महिन्याने आपली स्थिती बदलतो. आता उद्या १३ फेब्रुवारीला दुपारी २:४१ वाजता सूर्य कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. शनिदेव आधीपासूनच कुंभ राशीत विराजमान आहेत. अशा स्थितीत कुंभ राशीत शनिदेवाची आणि सूर्यदेवाची भेट होणार आहे. ज्योतिषशास्त्रात, शनि आणि सूर्यदेवाची युती शुभ मानली जात नाही. परंतु सूर्य गोचरनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला वसंत पंचमी असल्याने हा दिवस खूप खास आहे. या दिवशी शुभ संयोग जुळून येत असल्याने सूर्य-शनिदेवाच्या युतीने काही राशींना जबरदस्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ लोकांना मिळणार नशिबाची साथ?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना शनि-सूर्यदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

शनि-सूर्यदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना यावेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन कल्पनांमधून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानही मिळू शकतो.

(हे ही वाचा : ‘महालक्ष्मी योग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? २०२४ वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी)

धनु राशी

धनु राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. पैसे कमविण्याची नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्याचाच फायदा होऊ शकतो. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.

कुंभ राशी

शनि-सूर्यदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात काही करार निश्चित होऊ शकतात. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)