Surya Rashi Parivartan 2023: हिंदू धर्मात सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य हा कीर्ती, सामर्थ्य, अभिमान आणि सन्मान यांचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कोणत्याही राशीत ३० दिवस राहतो. मान आणि प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्यदेव आता दिवाळीनंतर म्हणजे शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ रोजी राशी परिवर्तन करणार आहे. सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करतील. सुर्यदेवाचे राशी परिवर्तन होताच काही राशींना सुख, समृध्दी, पैसा, नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुर्यदेवाची ‘या’ राशींवर कृपा?

वृषभ राशी

सुर्यदेवाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरु शकते. या काळात अडकलेले पैसे मिळून तुमच्या तिजोरीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. तसेच वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. 

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी सुर्यदेवाचे राशी परिवर्तन अनुकूल ठरू शकतो. नोकरीशी संबंधित काही उत्कृष्ट संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहून यावेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्य सुधारुन तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : २०२४ मध्ये ‘या’ ३ राशींच्या वाढू शकतात अडचणी; शनि-केतूचा ‘षडाष्टक योग’ ठरू शकतो हानिकारक! )

वृश्चिक राशी

सुर्यदेवाचे राशी परिवर्तन होताच वृश्चिक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले काम यशस्वी होऊ शकते. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख चैतन्य लाभू शकते.

मकर राशी

सुर्यदेवाच्या राशीपरिवर्तनाचा मकर राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. वैवाहीक आयुष्यात सुख समृद्धी लाभू शकते. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. नोकरदार लोकांना या काळात मोठे पद किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya rashi parivartan scorpio 2023 these four zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb