Surya Rashi Parivartan in Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव दर एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. सूर्यदेव हा प्राणशक्ती, ऊर्जा आणि जीवनाचा कारक मानला जातो. सूर्यदेव हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आता रक्षाबंधनाआधी १६ ऑगस्टला सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचा परिणाम सर्वच्या सर्व १२ राशींवर होणार आहे. पण त्यातील काही राशींवर याचा खास परिणाम दिसून येऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो.
‘या’ राशींचे उजळणार भाग्य?
वृषभ राशी (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन कल्पनांमधून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानही मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.
(हे ही वाचा : दीप अमावास्येला अद्भुत योग; आजपासून महिनाभर ‘या’ राशींवर चौफेर धनवर्षाव होणार? बुधलक्ष्मी होऊ शकते मेहेरबान )
सिंह राशी (Leo Zodiac)
सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात काही करार निश्चित होऊ शकतात. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळू शकतात.
धनु राशी (Dhanu Zodiac)
धनु राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये उंच शिखर तुम्ही गाठू शकता. परदेशाशी व्यवसाय संबंधित असेल तर आर्थिक फायदा होऊ शकतो. धनसंपत्ती वाढण्याचे अनेक स्त्रोत मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न तुमचे यशस्वी होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक फायदासोबत मान सन्मान वाढू शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)