Surya shani gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाचे प्रत्येक महिन्यातून एकदा राशी परिवर्तन होते. सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान असून यावेळी सूर्याची दृष्टी शनीवर पडत आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने ऑगस्ट महिन्यामध्ये मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशीत तो १५ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. त्यामुळे मंगळाचा सूर्य, गुरूसह खास संयोग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल.

शनी-सूर्य देणार भरपूर पैसा (Surya shani gochar 2024)

वृषभ

bappa mulank
Numerology : बाप्पाला आवडतो ‘हा’ मूलांक! तुमची जन्म तारीख सांगेल तुमचा मूलांक गणपतीला आहे का प्रिय?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचांग : मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
shani gochar 2024 saturn margi in kumbh these zodiac sign will be lucky
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशीच्या लोकांना लक्ष्मी देणार धनाचा हंडा! शनी मार्गस्थ असल्याने नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
9th September 2024 Rashi bhavishya Panchang in marathi
९ सप्टेंबर पंचांग: विशाखा नक्षत्रात ‘या’ राशींवर बसणार सुखाच्या सरी; आनंदाची वार्ता अन् शुभ-लाभाचा ठरेल दिवस, वाचा तुमचे भविष्य

वृषभ राशीमध्ये सूर्य चौथ्या घरात असून शनी दहाव्या भावात विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीचा समसप्तक दृष्टी संयोग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी कधी शुभ तर कधी अशुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येतील. पण सूर्याच्या प्रभावाने ती दूर होतील. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होईल. परंतु सूर्याच्या कृपेने ते देखील दूर होण्यास मदत मिळेल. नवीन गोष्टीं शिकण्यास प्राधान्य द्याल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. शनी आणि सूर्याचा संयोग तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल.

मिथुन

सूर्य आणि शनीचा प्रभाव मिथुन राशींच्या व्यक्तींवर अनुकूल सिद्ध होईल. सूर्याची दृष्टी भाग्य भावावर असून या ठिकाणी शनीदेव विराजमान आहेत. तसेच देवगुरू बृहस्पती बाराव्या घरात आणि मंगळ तुमच्या लग्न भावामध्ये विराजमान आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

हेही वाचा: नुसता पैसा! ३६४ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी

तूळ

सूर्य मिथुन राशीच्या अकाराव्या घरात असून शनी पाचव्या घरात आहे. त्यामुळे समसप्तक योग निर्माण होत आहे. एक वर्षानंतर हा शुभ योग निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)