Surya Shukra and Mangal Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिना ग्रहांच्या राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनामुळे अधिक खास होणार आहे. या महिन्यात सूर्यदेव मेष राशीत तर शुक्र मीन राशीमध्ये मार्गी होणार आणि मंगळ कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या तीन ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात त्या राशींचे भाग्य चमकेल तसेच त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशही मिळवता येईल.

‘या’ राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी एप्रिलमध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवी संधी मिळवाल, कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

कर्क

सूर्य, शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.

मकर

एप्रिलमध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)