Grah Gochar 2024 June: ज्योतिषशास्त्रात नवग्रह महत्त्वाचे मानले जातात. हे सर्व ग्रह विशिष्ट कालावधीनं आपापलं राशी स्थान बदलत असतात. या स्थान बदलाला प्रचंड महत्त्व असतं. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या राशीबदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो. या जून महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करत आहे. आता येत्या दिवसात सूर्य, बुध आणि शुक्र राशी बदल करणार आहेत. सूर्य, बुध आणि शुक्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. येत्या १२ जूनला शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करत आहेत तर १४ जूनला बुधदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत आणि १५ जूनला सुर्यदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. या तिन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशींना जीवनात अपार सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. पाहा भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष राशी

सूर्य, बुध आणि शुक्रदेवाचे राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी लाभू शकतात. यावेळी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा: २४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १३९ दिवस शनिदेवाची उलटी चाल कोणाला करणार श्रीमंत?)

मिथुन राशी

सूर्य, बुध आणि शुक्रदेवाच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना सूर्य, बुध आणि शुक्रदेवाच्या राशी बदलामुळे दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते. या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमधील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)