Surya Sukra Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहांतील सर्वांत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य हा आत्मा, मान- सन्मान, पद-प्रतिष्ठेचा कारक मानला जातो. सूर्याला पिता मानले जाते. अशा परिस्थितीत सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होत असतो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. दरम्यान, आता १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करील. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करताच गुरू ग्रह समोर येणार आहे. सूर्य आणि गुरू १८० अंशामध्ये एकमेकांच्या समोर येतील. अशा परिस्थितीत सूर्य आणि गुरू समोरासमोर आल्याने काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जेव्हा गुरू आणि सूर्य एकमेकांसमोर येणार तेव्हा कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते ते आपण जाणून घेऊ…

सूर्य-शुक्र एकमेकांसमोर येताच ‘या’ राशींचे नशीब फळफळणार

कन्या

गुरू आणि सूर्य एकमेकांसमोर येताच कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासह त्यांना चांगला वेळ घालवता येऊ शकतो. अनेक वर्षांपासून तुम्हाला त्रासदायक वाटणाऱ्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यासह दीर्घ काळापासून तुम्ही ज्या कामावर मेहनत घेत होता, त्या कामाचे फळ तुम्हाला मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होऊ शकतात. अशाने तुमचे काम वरिष्ठांसमोर येईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. अनेकांना करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी खूप वाव आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

तूळ

गुरू आणि सूर्य आमने-सामने आल्याने तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही चांगले दिवस येतील. या काळात तूळ राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करीत आहात, त्यात तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधी मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला फायदाही मिळू शकतो. त्यासह नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो; पण तुम्ही त्यातही यश मिळवू शकता. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबरचा वेळ चांगला जाऊ शकतो.

कुंभ

गुरू आणि सूर्य एकमेकांसमोर येताच कुंभ राशीच्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. त्याच काळात नवीन मित्र बनवण्यात आणि नवीन लोकांशी संवाद साधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्यातून प्रवास करण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. नोकरीमध्ये बढतीसह वरिष्ठ अधिकारी, तसेच सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्याचबरोबर पगारातही मोठी वाढ होऊ शकते. व्यवसायात नवीन भागीदारी करू शकता. याद्वारे तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. पैशाची बचत करण्यात यश मिळू शकेल. लव्ह लाईफ चांगले जाणार आहे.

हेही वाचा- नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader