Neechbhang Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. ज्याचा प्रभाव मानवी जीवन व पृथ्वीवर कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो. यातच आता १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सूर्यदेवाने तूळ राशीत प्रवेश केला आहे आणि त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२३ रोजी शुक्रदेवाने कन्या राशीत प्रवेश केलाय. या ग्रहस्थितीमुळे दुर्मिळ ‘नीचभंग राजयोग’ तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब सोन्याहून चमकण्याची शक्यता आहे.
नीचभंग राजयोगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार?
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नशिबाने साथ दिल्याने तुमची अपूर्ण कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जीवनात सुख समृध्दी लाभू शकते.
(हे ही वाचा : २०२४ सुरू होताच राहू-केतू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी )
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग फायदेशीर ठरु शकतो. या राशीतील लोकांना अचानक भरपूर पैसा मिळू शकतो, परदेशात जाण्याचे मार्ग तयार होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. जीवनात सुख-सुविधा वाढू शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते.
मकर राशी
नीचभंग राजयोग मकर राशीतील लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येऊ शकतो. या राशीच्या व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकं आणि व्यापारी त्यांच्या कामात चांगली कामगिरी करु शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कौटुंबिक सुखात वाढ होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)