Surya Transit In Mithun Rashi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देव जवळपास एक महिन्यानंतर एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. तसेच सूर्य देव जून महिन्यात आपल्या मित्र राशी मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही राशींचे नशीब पालटू शकतात. तसेच या नव्या नोकरीमध्ये प्रमोशन आणि इंक्रीमेंट मिळण्याचे योग जुळून येत आहे. जर हे लोक राजकीयदृष्ट्या सक्रिय असाल तर या लोकांना पद प्राप्ती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या दहाव्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना काम आणि व्यवसायात यश मिळू शकते. तसेच या हे लोक करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. मनाप्रमाणे टान्सफर होऊ शकते. करिअरमध्ये या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकतात. नवीन जबाबदारींना आत्मविश्वासासह निभावू शकतात. व्यावसायिकांना चांगला धनलाभ मिळू शकतो. वडीलांबरोबरचे संबंध आणखी दृढ होऊ शकतात.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

सूर्य देवाचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण हा गोचर या राशीच्या लग्न भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढेन. तसेच वेळोवेळी हे लोक लोकप्रिय होईल. या लोकांना मान सन्मान प्राप्त होईल. तसेच वैवाहिक जीवनात या लोकांना सहकार्य लाभेल. जोडीदारासह मिळून नवीन सुरुवात करू शकणार. जसे की घर खरेदी करणे, एकत्र गुंतवणूक करणे या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

सिंह राशि (Leo Zodiac)

सूर्य ग्रहाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायक ठरू शकतात. कारण सूर्य देव या राशीच्या इनकम आणि लाभ स्थानावर आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. तसेच इनकममध्ये नवीन सोर्स निर्माण होऊ शकतात. एक्सपोर्ट व इंपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दरम्यान चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायात अचानक मोठा लाभ होऊ शकतो. सरकारी कार्यांमध्ये यश मिळू शकते. पद प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच या काळात अपत्याकडून शुभ वार्ता ऐकायला मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)